अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील दोन गावठी दारू विक्रेत्यांवर मारवड पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मारवड येथील पोलिस ठाण्यापासून ५० मीटर अंतरावर असलेल्या वस्तीत बाई सीताराम वडार या महिलेवर कारवाई करत १३ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली तसेच माळन नदीकाठी माधव आनंदराव शिरसाठ याच्यावर कारवाई करत १८ लिटर गावठी दारू मिळून आली. नमुने घेवून उर्वरित माल नष्ट करण्यात आला असून दारूबंदी कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.