तालुक्यात शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये राबवला जाणार उपक्रम…
अमळनेर:- युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षनिमित्त आज २६ जून रोजी शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून अमळनेर शहरी व ग्रामीण भागातील जि.प. प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांमध्ये लोककल्याणकारी राजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर १०० व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अनुषंगाने १०० वक्त्यांमध्ये डीवायएसपी सुनिल नंदवालकर, गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, काॅलेजचे प्राध्यापक व सामाजिक कार्यकर्ते आदींचा समावेश आहे. ह्या वक्त्यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शाहू महाराजांच्या कार्याची ओळख होणार आहे. ह्या कार्यक्रमाने जिल्ह्यात ऐतिहासिक विक्रम नोंदविला जाईल. या व्याख्यानांचे आयोजन प्रा.अशोक पवार (अध्यक्ष युवा कल्याण प्रतिष्ठान,अमळनेर) यांनी केले आहे. या व्याख्यानासाठी राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाचे वक्ते परिश्रम घेत आहेत.