सात्रीचे महेंद्र बोरसे यांनी तालुकासह जिल्हा प्रशासन, पाटबंधारे विभागाला दिला इशारा…
अमळनेर:- पावसाळा जवळ येत असून रस्ता, मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि बोटीचे प्रशिक्षण देण्यास टाळाटाळ करणार्या प्रशासनाच्या विरोधात मृतांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची 22 मे रोजी सात्री ते जिल्हाधिकारी कार्यालय, तापी खोरे विकास महामंडळ कार्यकारी संचालक यांच्या कार्यालयापर्यंत अंत्ययात्रा काढून कार्यालयासमोर दफन करण्याचा इशारा महेंद्र बोरसे यांनी दिला आहे.
बोरसे यांनी यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल, अमळनेर प्रांताधिकारी, तहसिल कार्यालयाचे संतोष बावणे, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, कार्यकारी संचालक प्र. गो. मांदाडे, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ अधीक्षक अभियंता य. का. भदाणे, निम्न तापी प्रकल्प पाडळसरे कार्यकारी अभियंता मुकुंद चौधरी यांना निवेदन देण्यात आले आहे.
सदर निवेदनात नमूद केले आहे की, तालुक्यातील सात्री हे गाव निम्न तापी प्रकल्प पाडळसरे या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात पूर्णतः 100% बाधित असून गावालगत दक्षिणेस बोरी नदी आहे व उत्तरेस तापी नदी आहे. या दोन्ही नद्या व त्यांचे खोरे यांनी सादरी गावात चहुबाजूने पावसाळ्यात पूर परिस्थिती पाण्याचा वेढा असतो. त्याच्याने चार ते पाच महिने गावाचा संपर्क पूर्णतः तुटतो. त्यामुळे ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते व त्याचा विपरीत परिणाम ग्रामस्थांना भोगाव लागतो या कालावधीत साथीचे रोग व अन्य रोगांची मोठ्या प्रमाणात लागू होते. बाधित रुग्णांना आरोग्याच्या सुविधा मिळत नाही. पर्याय जीव गमावा लागतो.
मागील दोन वर्षात प्रमोद बोरसे (20), आरुषी भील (वय 11), उषाबाई भील (वय 55) या बाधित लोकांना वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला. यावेळी ग्रामस्थांच्या रोषाला व आंदोलनास प्रशासनाला सामोरे जावे लागले आहे. मृतांच्या वारसांना अद्याप पावतो मुख्यमंत्री सहायता निधी देखील उपलब्ध झालेला नाही.
शेतकरी, विद्यार्थी, स्तनदा माता, गरोदर माता, लहान बालकांची होरपळ…
या कालावधीत शेतकऱ्यांच्या पशुधन, दुधाळ गाई, म्हशी, शेळीचे आरोग्य देखील धोक्यात येवून अपंग होतात. तर काही मृत्युमुखी पडतात. पर्याय रस्ता नाही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. शेतकरी पावसाळ्यात पिकांवर येणाऱ्या रोगांवर योग्य ती खते व फवारणीचे औषधे उपलब्ध करू शकत नाही. त्यामुळे त्यांचा उत्पन्नावर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. अशा असंख्य समस्यांना या संपर्क तुटल्याचा काळात पर्यायी रस्ता नसल्याने सामोरे जावे लागते. या कालावधीत शाळकरी मुलांचे देखील मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होते. स्तनदा माता, गरोदर माता, लहान बालक लसीकरणापासून वंचित राहतात.
पॉवर बोटीचे प्रशिक्षण देण्यास टाळाटाळ, ठरतेय शोभेची वस्तू…
दिनांक 26 जानेवारी 2023 रोजीचा जलसमाधी आंदोलनसाठी व्यवस्थापन विभागाकडून तहसीलदार यांच्यामार्फत पॉवर बोट ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. सदर बोटची प्रात्यक्षिक करणे व गावातील पोहणारे स्वयंसेवक यांना प्रशिक्षण देण्याबाबत अनेक वेळी संपर्क करून लेखी पत्र देऊन असे सुचित करण्यात आले आहे. परंतु त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. म्हणून ही बोट गावकऱ्यांसाठी फक्त शोभेची वस्तू ठरली आहे.
पर्यायी रस्ता मिळण्याची शाश्वती नाहीच…
26 जानेवारी 2023 च्या जलसमाधी आंदोलनात प्रशासनाने तातडीने प्राधान्याने पर्याय रस्त्याची प्रक्रिया पूर्ण करून रस्ता उपलब्ध करून दिला जाईल, याबाबत लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले होते. याबाबत जलसंपदा विभागाच्या कार्यालयाशी वारंवार संपर्कात आहोत. होते, करताय, होऊन जाईल, अशा पद्धतीने समजूत काढली जाते. प्रत्यक्ष मात्र निविदा प्रक्रिया अद्याप पर्यंत सुरू झालेले नाही व पर्यायी रस्ता मिळण्याची कोणतीही शाश्वती नाही. या पावसाळ्यात उपचारा अभावी जीवित हानी झाल्यास त्याला जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर अंतिम संस्कार करण्यात येतील. त्याच प्रशासन जबाबदार राहील व त्यास मृत्यू जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून याबाबत गांभीर्याने नोंद घ्यावी या सर्व बाबींनी ग्रामस्थ हतबल झाले असून विषयाचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी 22 मे रोजी मयताची प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून कार्यालयासमोर दफन केले जाईल, याची नोंद घ्यावी असा इशारा महेंद्र बोरसे यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.