
अमळनेर:- तालुक्यातील धार येथील रस्त्याच्या कामाला निधी मिळण्याबाबत ग्रामस्थांनी आमदार अनिल पाटील यांना निवेदन दिले.

तालुक्यातील धार येथील भवानी माता मंदिर ते पीर बाबा दर्गा ह्या दोन किमी रस्त्याची दुरवस्था झाली असून भाविकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. तसेच ह्या रस्त्याने शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना ही मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याने ह्या रस्त्यासाठी निधीची मागणी आमदार अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावर आमदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. निवेदन देतेवेळी शेतकी संघाचे मा. प्रशासक अलीम मुजावर, विकासो सदस्य नाजअहमद उर्फ बाबू पेंटर, सलाबद्दीन मुजावर हाजी नईम मुजावर अजीम मुजावर जमील शरफोददिन मुजावर व मुजावर पंच कमिटी आदी उपस्थित होते.








