किसान काँग्रेसच्या आंदोलनाने वेधले शासनाचे लक्ष, माविआ नेत्यांची उपस्थिती…
अमळनेर:- शासन शेतमालाला भाव देत नाही आणि आहे ते भाव उतरवल्याने शेतकऱ्यांची अवस्था जिवंत असूनही मेल्यासारखी अवस्था झाल्याने किसान काँग्रेस आणि महाविकास आघाडीतर्फे शेतकऱ्यांचे श्राद्ध, गंधमुक्ती व श्राद्ध भोजनाचे अनोखे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे अध्यक्ष पराग पष्टे, राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील, जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश पाटील, प्रा सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली ६ रोजी सकाळी तहसील कार्यालयाबाहेर आंदोलनाला सुरुवात झाली. सुभाष पाटील, चुनिलाल पाटील,सुनील पाटील, प्रताप पाटील यांनी मुंडण केले त्यानंतर नीळकंठ पाटील यांनी मंत्रोच्चार करत विधिवत गंधमुक्ती कार्यक्रम झाला. उत्तरकार्याला कावळ्याला नैवैद्य दिले जाते त्याप्रमाणे आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व शिरीष सैंदाणे याना चटणी कांदा भाकरीचे नैवैद्य आणि मागण्यांचे निवेदन दिले. त्यांनंतर सर्व आंदोलकांनी मंडपातच चटणी, कांदा, भाकरीचे श्राद्ध भोजन केले. या अनोख्या आंदोलनाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. रस्त्यावरील येणारा जाणारा प्रत्येकजण थांबून बराच वेळ निरीक्षण करीत होता. शासनाने कापसाचे भाव उतरवले आणि विदेशातून कापूस आयात केला. ज्वारी, बाजरी, कांदा आदी शेतमालाचे देखील भाव उतरवले. परिणामी शेतकरी पुरता मेला आहे. वारंवार मागणी करूनही शासन लक्ष देत नाही म्हणून अनोखे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. आंदोलनात आदिवासी काँग्रेसचे बळवंत गावित, विभागीय अध्यक्ष उत्तम देसले, बाजार समिती संचालक डॉ अनिल शिंदे, नितीन पाटील, भोजमल पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, बी के सूर्यवंशी, संदीप पाटील, प्रा सुरेश पाटील, शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख श्रीकांत पाटील, अनंत निकम, सुरज परदेशी, प्रा श्याम पवार,राजू फापोरेकर , संभाजी पाटील, मुन्ना शर्मा, बन्सीलाल भागवत, कैलास पाटील, श्रावण तेले, एल टी पाटील, रवींद्र पाटील,बाळू कदम आदी उपस्थित होते.