
अमळनेर शहरातील केव्ही ट्रॅकर ग्रुपचा अनोखा उपक्रम…
अमळनेर:- शहरातील केव्ही ट्रॅकर ग्रुपने राज्याभिषेक दिना निमित्त अनोखा उपक्रम राबवत चौगाव जवळील विजयगडावर राज्याभिषेक दिन साजरा केला.

राज्याभिषेक दिनानिमित्त शहरातील केव्ही ट्रॅकर ग्रुपतर्फे लासुर चौगावजवळील विजय गडावर महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिव गर्जना करत राज्याभिषेक दिन साजरा केला. सदर किल्ला हा चौगाव गावापासून चार किलोमीटर अंतरावर असून त्याच्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. सदर किल्ल्याची पर्यटन विभागाने दुरुस्ती करावी अशी मागणी केव्ही ट्रॅकर ग्रुपने यावेळी केली आहे. केव्ही ट्रॅकर ग्रुपचे सचिन वाघ,कैलास केदार,यज्ञेश सोनार, अमोल पाटील, निलेश महाजन, आर एन मोरे,जगदीश शिसोदे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. या आधी या ग्रुपने लळिंग, सोनगीर किल्ला, राजगड, साल्हेर, हरिहर, वज्रगड, पुरंदर ह्या गड किल्ल्यांवर शिवराज्याभिषेक दिन साजरा केला आहे.







