
बँकेच्या आवारात रंगला नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा…
अमळनेर:- येथील अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी मोहन बाळाजी सातपुते तर व्हाइस चेअरमनपदी प्रदीप कुंदनलाल अग्रवाल यांची बिनविरोध निवड काल दि. 19 रोजी संचालक मंडळाच्या सभेत करण्यात आली.
सुरवातीला निवडणूक निर्णय अधिकारी व्ही एन जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या सभागृहात संचालक मंडळाची निवड सभा पार पडली. यावेळी दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने दोंघांची बिनविरोध जाहीर करण्यात आली. निवडीनंतर हितचिंतकानी बाहेर जल्लोष साजरा केला.सभेला विद्यमान संचालक प्रविण जैन, पंडित चौधरी,दीपक साळी,पंकज मुंदडा,प्रदीप अग्रवाल,भरत ललवाणी, अभिषेक पाटील, लक्ष्मण महाजन,सौ वसुंधरा लांडगे, डॉ मनीषा लाठी,रणजित शिंदे उपस्थित होते.यावेळी सहा निवडणूक अधिकारी सुनिल महाजन, बँकेचे मॅनेजर अमृत पाटील उपस्थित होते.
नूतन पदाधिकाऱ्यांवर सत्काराचा वर्षाव….
निवड झाल्यानंतर बँकेच्या आवारात सत्कार सोहळा पार पडला,यावेळी खा शि मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे यांनी तालुक्यातील सर्वात महत्वाची ही बँक आहे, संचालक मंडळास रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार चांगली कामे करावीच लागणार आहेत, कडक व चांगले नियम रिझर्व्ह बँकेने केले आहेत,बँकेचा विस्तार व्हावा ही सर्वांची इच्छा आहे,मोहन सातपुते व प्रदीप अग्रवाल चांगले काम करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
सुरवातीला प्रास्तविक अमृत पाटील यांनी केले.तर संचालक मंडळाच्या वतीने पंडित चौधरी यांनी पॅनलच्या नेते मंडळींनी संचालकांना पुन्हा निवडणूक लढविण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानले.बँकेच्या प्रगतीसाठी डॉ मनीषा लाठी व लक्ष्मण महाजन हे आमच्या सोबतच असल्याचे सांगत येणाऱ्या काळात बँकेचा विकास आणि कर्मचारी व सभासद यांचे हित जोपासले जाईल अशी ग्वाही दिली. याप्रसंगी कुंदनलाल अग्रवाल, बजरंग अग्रवाल,खा शि मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे,संचालक विनोद पाटील, योगेश मुंदडा,हरी भिका वाणी,डॉ संदेश गुजराथी,अध्यक्ष जितेंद्र झाबक, माजी कार्याध्यक्ष जितेंद्र जैन,प्रविण साहेबराव पाटील,सौ माधुरी पाटील,बन्सीलाल भागवत, अँड विवेक लाठी,गिरीश जैन, महेश पवार,योगेश मुंदडा, नितीन निळे,प्रताप साळी,सुरेश अर्जुन पाटील,दशरथ लांडगे, मनीष जोशी, मुन्ना शर्मा,गणेश गुप्ता, हर्षल पाटील, प्राचार्य महाजन, नाईक प्रल्हाद पाटील, प्रसाद शर्मा,ईश्वर सैनानी,विजय शेखनाथ पाटील यासह बँकेचे असंख्य सभासद व मान्यवर उपस्थित होते.आभार रणजित शिंदे यांनी मानले.








