अमळनेरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने २३ कर्तृत्ववान महिला सन्मानित
अमळनेर:- येथील मौर्य क्रांती संघ व सकल धनगर समाजाच्यावतीने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २३ महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. डि.ए. धनगर यांनी प्रास्ताविकात महाराष्ट्र शासनाच्यावतीने महिलांचा पुरस्कार देऊन गौरव केला पण शहरी भागातील महिला वंचित राहिल्या म्हणून हा पुरस्कार वितरण सोहळा शहरी भागासाठी घेण्यात आला असे सांगितले. वसुंधरा लांडगे यांनी स्वागतगीत म्हटले. त्यानंतर आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.अमळनेर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समितीचे प्रमुख डॉ. अविनाश जोशी पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. प्रमुख पाहुणे माजी आमदार डॉ. बी.एस.पाटील, जि.प.सदस्या जयश्री पाटील,खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे, नगरसेवक श्याम पाटील प्रा.अशोक पवार,हिरामण कंखरे, ऍड रज्जाक शेख, रियाज मौलाना यांच्या हस्ते महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. धरणगाव येथील शिक्षक डी.ए. पाटील यांनी आपल्या व्याख्यानात आमचे महापुरुषांचे विचार जयंती, पुण्यतिथी पर्यंतच कळाले पण ते डी.जे.पर्यंत येऊन थांबले आणि येथेच तरुणांचा घोळ झाला. व्हिएतनाम सारखा देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालतो.मेंढपाळाच्या पोटी जन्म घेणाऱ्या अहिल्याबाई या माधवराव होळकरांच्या सून झाल्या तेव्हापासून त्यांच्या जीवनाला गती मिळाली. सासऱ्यांनी त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली त्यामुळे अहिल्याबाई सर्व जगाला कळाल्या असे त्यांनी सांगितले. माजी आमदार डॉ. बी एस पाटील, क्रांती संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत, डॉ.अनिल शिंदे.प्रा. अशोक पवार, जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांनी अहिल्याबाई होळकर यांच्यावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मौर्य क्रांती संघ व सकल धनगर समाजाच्या वतीने बन्सीलाल भागवत, गोपीचंद शिरसाठ, एस. सी.तेले, प्रभाकर लांडगे, डी.ए.धनगर, यांनी परिश्रम घेतले. रमेशदेव शिरसाठ, हरचंद लांडगे, ज्ञानेश्वर कंखरे, देवा लांडगे, गोपाल हाडपे, प्रा.गजानन धनगर,प्रा.मनोज रत्नपारखी, शशिकांत आढावे, भावलाल पाटील, तुषार इधे, आदेश धनगर, उमेश मनोरे, रमेशदेव शिरसाठ, गोपाल हडपे,गजानन धनगर, बापू सांगोरे,आत्माराम साबे, उमेश मनोरे, सुरेश हडपे,योगेश बोरसे, सुनिल मासुळे, सुनिल हटकर हे समाज बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन एस.सी.तेले व प्रा.सुचिता रत्नपारखी यांनी केले तर आभार गोपीचंद शिरसाठ यांनी मानले.
प.पू.विद्या दीदी, सारिका बेन रवींद्र पाटील, शगुप्ता बानो समद बागबान,स्नेहा एकतारे, सुलोचना पाटील, मिनाबाई पाटील, जयश्री साबे, रूपाली चेतन राजपूत, सुचित्रा रत्नपारखी, मनीषा पाटील,विद्या लांडगे,अनिता रवींद्र मोरे, प्रज्ञा हडपे,ज्योती पाटील, कविता आढावे, सुवर्णा पाटील,मेघा कंखरे, भारती पाटील,विद्या चौधरी, दिपाली शिरसाठ, सुषमा बोरसे,मंगला पाटील,व श्रीमती द्रौ.रा.कन्याशाळेच्या उपशिक्षिका ललिता दिनेश पालवे यांना सन्मानित करण्यात आले.