दोन्ही गटातील ६१ जणांवर गुन्हा दाखल तर २९ जणांना केली अटक…
अमळनेर:- शहरात ९ रोजी रात्री दोन गटात तुफान दगडफेक झाली असून विविध ठिकाणी धार्मिक स्थळांवर ही दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान करण्यात आले आहे. एका पोलीस अधिकाऱ्यावर तलवार हल्ला करून दगडफेकीत तीन अधिकारी व तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. दोन्ही गटातील ६१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर २९ जणांना अटक करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी तीन दिवसांसाठी १४४ कलम प्रमाणे संचारबंदी जाहीर केली आहे.
दिनांक ९ मे रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जिनगर गल्लीत दोन गटात दगडफेक सुरू असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, पोलीस उपनिरीक्षक भैयासाहेब देशमुख पोलीस ताफ्यासह हजर झाले. काही वेळात प्रभारी अधिकारी रामदास वाकोडे पारोळा पोलिसांसह हजर झाले तेव्हा दोन्ही गटाच्या हातात लाठ्या काठ्या दगड होते. पोलीस त्यांना शांततेचे आवाहन करीत असताना त्यांनी धार्मिक घोषणाबाजी केली आणि पोलिसांवर फरश्या व दगडांनी हल्ला चढवला. इरफान जहुर बेलदार याने तलवारीने राकेशसिंग परदेशी यांच्यावर वार केला त्यांनी तो चुकवला असता त्यांच्या पायाला लागून हाड फ्रॅक्चर झाले. यावेळी एका गटाने दगडफेक केली. त्यात पोलीस उपनिरीक्षक देशमुख, हितेश बेहरे, राहुल पाटील, धुळे आरसीएफचे अनिल सोनवणे, मगनराव घटे हे कर्मचारी जखमी झाले. तसेच पानखिडकी भागात जाऊन इलेक्ट्रिक डीपी वर व रहिवाश्यांच्या घरावर दगडफेक करून तोडफोड व नुकसान केले आणि विद्युत पुरवठा खंडित केला. त्यांनतर लागलीच दुसऱ्या गटाने खड्डा जीन भागातील एक धार्मिक स्थळावर दगड फेक केली. त्यानंतर काही वेळात जुना पारधीवाडा भागात पहिल्या गटाने जुना पारधी वाडा भागात दगडफेक केली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी सुनील नंदवाळकर, चोपडा डीवायएसपी कृषिकेश रावळे यांनी रात्री पाहणी करून पोलिसांना आदेश देऊन २९ जणांना ताब्यात घेतले असून एकूण ६१ जणांवर एपीआय परदेशी यांच्या फिर्यादीवरून जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, दंगल व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल….
१) मुस्तफा जमाल अब्दुल अकील वय १५ वर्षे, २) इरफान जहुर बेलदार, ३) मोहसिन सलीम खाटीक, ४) कादर अली शेरा अली, ५) अशपाक उर्फ पक्या सलीम, ६) रिजवान शेख सलीम, ७) तौसीफ सईद खाटीक, ८) अब्दुल जमीर अब्दुल जब्बार, ९) अब्दुल रज्जाक अब्दुल गफार १०) अब्दुल अकील अब्दुल जब्बार, ११) अफरेज जमाल अब्दुल अजीज शेख बेलदार, १२) साकीब खाँ इकबाल खाँ, १३ ) आकीबखॉ मुजफर खॉ, १४) राकेश राजेंद्र बारी, १५) गोपी विभाकर कासार, १६ ) दौलत खॉ मुजफर खाँ, १७) अब्दुल नबी अब्दुल करीम, १८) सईद यासीन खाटीक, १९) साजीद हुसेन जाकीर हुसेन, २०) अल्ताफ गुलाम हुसेन, २१) वसीम खाँ गुलाब खाँ, २२) रिहान शेख कलीम खाटीक, २३) अल्ताफ रफिक पिंजारी, २४) भैय्या सुभान पिंजारी, २५) अहमद खॉ अयुब खॉ, २६) कुणाल राजेंद्र भावसार, २७) ईश्वर कैलास लांडगे, २८) योगेश कैलास लांडगे, २९) रुपेश हरी पाटील, ३०) लोकेश अनिल ठाकुर सर्व रा. अमळनेर, ३१) कैसर आबादी शेख, ३२) सुरज चंदुसिंग परदेशी, ३३) मनोज शशीकांत मराठे, ३४) जयेश बबन ठाकरे, ३५) सलीम शेख चिरागोद्दीन उर्फ सलीम टोपी, ३६) शकील शेख बबलु ( नारळवाला), ३७) शोएब सैय्यद गुलचंद सैय्यद, ३८) तौसीफ तायर बेलदार, ३९) बाबा कुरेशी मुस्तफा, (४०) मुन्ना एलीयाज खाटीक, ४१) तौसीफ अली ताहेर अली, ४२) परवेज शकील मिस्तरी, ४३) सलीम शेखलाख मिस्तरी, ४४) अकबर उस्मान मिस्तरी, ४५) सलमत अकबर मिस्तरी, ४६) जाकीर हुसेन मोहम्मद हुसेन, ४७) अब्दुल करीम अब्दुर रशीद, ४८) सद्दामखाँ गुलाबखा, ४९) असलम शेख मिस्तरी, ५०) नौसिफ नुर खान, ५१) सुलतान अंडावाला, ५२) तनवीर शेख मुख्तार उर्फ फल्ली, ५३) मुज्जफर भंगारवाल्याचा भाऊ नांव माहीत नाही, ५४) भाईसाहेब चहावाला, ५५) मोहसीन जडीबुटीवाला, ५६) रफीक उस्मान, ५७) कैसर आबीद शेख, ५८) जुनेद शेख अरमान शेख, ५९) राजमलमल जैन, ६०) गणेश उर्फ डिब्बा जाधव, ६१) एक अज्ञात इसम तसेच इतर दोन्ही समाजातील ३५ ते ४० इसम.