तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांनी शेतकऱ्यांना केले आवाहन…
अमळनेर:- पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला केंद्र सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ घेण्यात देण्यात येतो. योजनेच्या चौदाव्या हप्त्याचा लाभ जून 2023 मध्ये जमा होणार आहे. केंद्र सरकारने या चौदाव्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी बँक खाते आधार क्रमांकाची संलग्न व ई केवायसी प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले आहे.या दोन्ही बाबी लाभार्थ्याने परिपूर्ण केल्याशिवाय त्या पुढील हप्त्याचा लाभ अदा होणार नाही. या पार्श्वभूमीवर लाभार्थी शेतकऱ्यांनी तातडीने आपला आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अमळनेर भरत वारे यांनी केले आहे.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत अंमळनेर तालुक्यातील प्रत्येक गावात कृषी सहायकांमार्फत प्रचार व प्रसिद्धी व पीएम किसान कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याची सोय जागेवरच उपलब्ध करून दिली जात आहे. यासाठी वेगवेगळ्या गावात कॅम्प आयोजन केले जात आहे. धार, मारवड, निम, वावडे, चौबारी, ढेकू, डांगरी, अमळगाव, हिंगोणे, पातोंडा, डांगर,मंगरूळ,शिरूड इ. गावात मोहीम राबविली जात आहे असे मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांनी सांगितले. यासाठी कृषी पर्यवेक्षक योगेश वंजारी, अमोल कोठावदे, दीपक चौधरी,प्रवीण पाटील ,मंहेंद्र पवार, अविनाश खैरनार यासह सर्व कृषी सहाय्यक परिश्रम घेत आहेत.