एमपीएससी, यूपीएससी परीक्षेबाबत मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन…
अमळनेर:- येथील रुख्मिणीताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात सोमवारी (ता.१९) सकाळी दहाला गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार व प्रेरणादायी व्याख्यान होणार आहे. यावेळी तालुक्यातील सर्व १२ वी कला शाखेतील उत्तीर्ण झालेल्या मुलींचा सन्मान करण्यात येणार आहे. गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी डी. बी. पाटील, संस्थेचे प्रशासकीय व विकास अधिकारी प्रा श्याम पवार या मान्यवरांच्या हस्ते मुलींना सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक उमेश काटे यांचे “एमपीएससी, यूपीएससी या परीक्षेचा अभ्यास कसा करावा” या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाला के. डी. गायकवाड ज्यु कॉलेजचे प्राचार्य ए. व्ही. नेतकर, सावित्रीबाई फुले ज्यु कॉलेजच्या प्राचार्या गायत्री भदाणे, मुंदडा ज्यु कॉलेजचे प्राचार्य नरेंद्र साळुंखे, शिवाजी ज्यु कॉलेजचे प्राचार्य एम. ए. पाटील, मंगरुळ ज्यु कॉलेजचे प्राचार्य प्रकाश पाटील, अमळगांव ज्यु कॉलेजचे प्राचार्य रविंद्र पाटील, शिरसाळे ज्यु कॉलेजचे प्राचार्य संजय बोरसे, वावडे ज्यु कॉलेजचे प्राचार्य सुनिल पाटील, कळमसरे ज्यु कॉलेजच्या प्राचार्या कल्पना शिसोदिया, मांडळ ज्यु कॉलेजचे प्राचार्य बी. बी. चव्हाण, जानवे ज्यु कॉलेजचे प्राचार्य पी. एस. पाटील, नगांव ज्यु कॉलेजचे प्राचार्य तुषार पाटील, पातोंडा ज्यु कॉलेजचे प्राचार्य श्री. शिंगाणे सर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, तरी या कार्यक्रमाला तालुक्यातील १२ वी उत्तीर्ण झालेल्या सर्व कला शाखेतील केवळ मुलींनी उपस्थित राहावे, असे आवाहन रुख्मिणीताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस जे शेख यांनी केले आहे.