श्रीमंत प्रताप शेठजींच्या पुतळ्यास केले माल्यार्पण…
अमळनेर:- येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाचा २० जून रोजी ७८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी खानदेश शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सरस्वती पूजन करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते श्रीमंत प्रताप शेठजी व श्रीमती भागीरथीबाई अग्रवाल यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले. तसेच हवेत फुगे सोडून वर्धापनदिनाचा आनंद व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, संचालक हरी भिका वाणी, डॉ. संदेश गुजराथी, कल्याण पाटील, विनोद पाटील, सी.ए नीरज अग्रवाल, योगेश मुंदडे, संस्थेचे चिटणीस तथा प्राचार्य डॉ. ए.बी. जैन, सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव, महाविद्यालय प्राध्यापक प्रतिनिधी प्रा. आर.एम.पारधी, उपप्राचार्य डॉ.जयेश गुजराथी,डॉ. जी. एच. निकुंभ, डॉ. जयंत पटवर्धन, प्रा. पराग पाटील, डॉ. कल्पना पाटील, डॉ. विजय मांटे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.उल्हास मोरे तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.बी. जैन यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी महाविद्यालयाची गुणवत्ता व विकासाबरोबरच महाविद्यालयाची वैभवी परंपरा उलगडून दाखविली. प्रताप महाविद्यालयाचा वर्धापन दिन यावर्षी सुट्टीचा कालावधी असल्यामुळे साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यापुढे महाविद्यालयाचा वर्धापन दिवस मोठ्या दिमाखदार पद्धतीने साजरा केला जाईल. असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.बी.जैन यांनी सांगितले. कार्यक्रमाचा समारोप प्रा.डॉ. रमेश माने लिखित प्रताप महाविद्यालयाच्या शीर्षक गीताने करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. रमेश माने यांनी केले.