अमळनेर:- येथील लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात काल 21 जून रोजी जागतिक योग दिवस उत्साहात पार पडला. यावेळी नवीन मराठी शाळेचे माजी शिक्षक चतुर ठाकरे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी योगासनाचे प्रकार केले. त्यानंतर लोकमान्य विद्यालयाचे जेष्ठ मनोहर महाजन यांनी चतुर ठाकरे सर यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक मनोहर महाजन तसेच जितेंद्र चौधरी, शैलेश काळकर, भूषण महाले, विजय सूर्यवंशी जेष्ठ शिक्षिका सायली देशपांडे तसेच रेखा कांबळे, मृदुला झारे, माधुरी सोनार तसेच नाईक सुधीर माळी आदी उपस्थित होते.