आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध उपक्रमांचे केले होते आयोजन….
अमळनेर:- भारतीय प्राचीन विद्याशास्त्रातील” योगशास्त्र आणि त्याचे शिक्षण” आज आधुनिक युगातही तितकेच महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल [ सी.बी.एस.ई.] येथे बुधवारी सकाळी अतिथी गण, पालक वर्ग व शिक्षकांसमवेत विद्यार्थ्यांनी योगा करत योग दिन साजरा केला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अमळनेर न. पा.चे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, रामदेव बाबा, महिला योगा समितीच्या सदस्या कामिनी पवार, शाळेचे चेअरमन नीरज अग्रवाल, मुख्याध्यापक हेमंत देवरे, उपमुख्याध्यापक विनोद अमृतकर तसेच पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर प्रमुख अतिथींचे स्वागत मुख्याध्यापक व उप मुख्याध्यापक यांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन केले. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी योगा दिनाविषयीचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले तसेच स्वस्थ व निरोगी शरीरासाठी केवळ एका दिवसापूर्वी योगासने न करता दैनंदिन जीवनातील योगासन करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना देण्यात आला. त्यानंतर रामदेव बाबा महिला योगा समितीच्या सदस्या कामिनी पवार यांनी विद्यार्थ्यांना शरीर व मनाच्या संतुलनासाठी योगाचे महत्त्व स्पष्ट केले तसेच स्वतः विविध योगासने करून सर्व विद्यार्थ्यांकडून योगासने करून घेतली व प्रत्येक योगाचे महत्त्व- फायदे ही विद्यार्थ्यांना पटवून दिली. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापकांनी ही शाळेतील विद्यार्थ्यांना योगा करण्याचे फायदे सांगून योगा दिनाचे महत्त्व सांगितले .तसेच ‘सायन्स ओलंपियाड फाउंडेशन’ तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते गोल्ड मेडल व सर्टिफिकेट देण्यात आले. त्यानंतर शाळेतील शिक्षिका निशा पाटील व सोनाली पाटील यांनी शांतीपाठ व संकल्प प्रतिज्ञा सर्व विद्यार्थ्यांकडून वदवून घेतली. योग दिनानिमित्त कलरींग, निबंध लेखन, पोस्टर मेकिंग इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश शेळकर व यशस्वी चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक,उप मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.