
लायन्स आणि लिओ क्लबचे पदाधिकारी स्वीकारणार पदभार..
अमळनेर:- येथील लायन्स क्लब अमळनेर २०२३-२४ चा ५५ वा पद्ग्रहन सोहळा ला.अविनाश शर्मा (अबू रोड,राजस्थान), पीएमजेएफला गिरीश सिसोदिया (जळगाव), एमजेएफला हिना रघुवंशी (नंदुरबार) यांच्या प्रमुख उपस्थितीत २४ जून रोजी सायंकाळी ७ वाजता बन्सीलाल पॅलेस येथे पार पडणार आहे.
यावेळी लायन्सच्या नवनियुक्त प्रेसिडेंट पदी दिलीप गांधी, सेक्रेटरी दिनेश मणियार, खजिनदार पंकज मुंदडे, तर लिओ च्या प्रेसिडेंट पदी प्रणित झाबक, सेक्रेटरी वेद पाटील, खजिनदार चिराग मुंदडे हे पदभार स्वीकारणार आहेत.
२०२२-२३ चे मावळते प्रेसिडेंट योगेश मुंदडे,सेक्रेटरी महावीर पहाडे,खजिनदार अनिल रायसोनी, लिओ चे प्रेसिडेंट हरिओम अग्रवाल,सेक्रेटरी मिहीर पवार,खजिनदार कौशल गोलच्छा यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असून लायन्स व लिओच्या माध्यमातून मागील वर्षात केल्याल्या सामाजिक तसेच इतर कार्याचा आलेख उपस्थितांसमोर मांडणार आहेत.




