अमळनेर:- तालुक्यातील खेडी(प्र.ज.) येथे इयत्ता 10 वी व 12 वीसह विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा राजमुद्रा अभ्यासिकेतील हॉलमध्ये संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन जन सुराज्य ग्रामविकास मंडळ,ग्रुप ग्रामपंचायत खेडी व राजमुद्रा अभ्यासिका यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंचा आशा पाटील ह्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील ह्या उपस्थित होत्या. यावेळी धनदाई कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.डॉ. किशोर पाटील, कृषी पर्यवेक्षक योगेश खैरनार,उपसरपंच शोभाताई पाटील,ग्रामपंचायत सदस्या मंगला पाटील, दिपक पाटील हे मान्यवर मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी दहावी, बारावी, स्कॉलरशिप, पोलीस भरतीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून कागदपत्रांची फाईल,गुलाबपुष्प, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले यावेळी खेडीचे सुपुत्र धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयात ग्रंथपाल या पदावर कार्यरत असलेले प्रा डॉ प्रविण पवार यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रम मंडळावर वर्णी लागल्याने त्यांचा मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पातोंडा मंडळावर कृषी सहाय्यक असणाऱ्या योगेश खैरनार यांची नुकतीच कृषी पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती झाली त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण चव्हाण यांनी केले, यावेळी प्रास्ताविक प्रा. डी. डी. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. कैलास पाटील यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भास्कर पाटील,विलास शिंदे, ज्ञानेश्वर पाटील, सुनील पाटील, जिजाबराव पाटील, अनिल पाटील, सरवर पिंजारी,सलीम पिंजारी, नामदेव पाटील,तानाजी पाटील, राजमुद्रा अभ्यासिकेतील सर्व सदस्यांनी सहकार्य केले.