दर तीन महिन्यांनी घेण्यात येणार तक्रार निवारण सभा….
अमळनेर:- येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागात तालुका तक्रार निवारण समितीच्या सर्व शिक्षक संघटना व अध्यक्ष व सर चिटणीस यांची सभा २६ रोजी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विशाल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून या सभेत विविध समस्यांवर तोडगा काढण्यात आला आहे.
यावेळी दिव्यांग कर्मचाऱ्यांची कामे प्राधान्याने करण्यात यावे तसेच सेवा पुस्तक अद्यावत करणे व पडताळणी करणे, सर्व दिव्यांगाना बी.एल.ओ चे कामे देऊ नयेत, शालेय पोषण आहार अनुदान वाटप अहवाल माहेवार, कमी जास्त अनुदान बाबत मार्गदर्शन, अनुदान खर्चाची पीडीएफ तालुकास्तरावर देण्यात यावी, स्वयंपाकी मदतनीस मानधन वेळेवर मिळावे, समग्र शिक्षा अनुदान खर्च दिल्यानंतर विना विलंब तालुका स्तरावरून व्हेंडर तयार करून खर्च करून मिळावा, जिपीएफ चा दुसरा हप्ता अजून जमा झालेला नाही त्याबाबतीत आपल्या स्तरावरून लवकर कारवाई करण्यात यावी, सेवा पुस्तकातील रजा अद्यावत करण्यात याव्या व त्या नियमित भरण्यात यावे, निवड श्रेणीतील त्रुटी दूर करून नवीन प्रस्ताव सादर करणे, काही शाळांनी इन्कम टॅक्स अकाउंट खाते नंबर दिलेला नाही त्यासाठी संघटना प्रतिनिधी यांनी स्टेट बँक शाखेत जाऊन अधिकचे प्रयत्न करावेत, दुय्यम सेवा पुस्तक भरून शिक्षकांना देण्यात यावे त्याचे नियोजन केंद्रनिहाय करण्यात यावे, हिंदी भाषा सुट देणे साठी सर्व तालुक्यातील शिक्षकांची यादीस मंजुरी देण्यात यावी तशी नोद सर्व्हीस बुकात घेण्यात यावी, वरील सर्व विषयांवर सखोल चर्चा होऊन तक्रार निवारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. तक्रार निवारण सभा दर तीन महिन्यांनी घेण्यात येईल असे आश्वासन गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांनी दिले.
सदर सभेस विस्तार अधिकारी पी डी धनगर, विस्तार अधिकारी रावसाहेब पाटील, सर्व केंद्रप्रमुख सर्व संघटनांचे अध्यक्ष व सरचिटणीस वाल्मीक मराठे, सुनील मोरे, गजानन चौधरी, विनोद पाटील, राजू कोळी, आनंदराव अहिरे,सुधीर चौधरी, छगन पाटील,रवींद्र पाटील, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांनी सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देऊन सर्व शिक्षक संघटनांचे आभार मानले.