कलाशिक्षक राकेश विसपुते यांच्या कल्पकतेचे सर्वत्र कौतुक…
चोपडा:- ऍक्रेलिक कलरच्या सहाय्याने तुळस पत्रावर विठ्ठलाचे चित्र व पांडुरंग नावाचे अक्षरचित्र कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी साकारले असून त्यांच्या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आषाढी एकादशीनिमित्ताने राकेश विसपुते या कला शिक्षकाने तुळशी पत्रावर विठ्ठलाचे रूप साकारले. पंढरीच्या वारीला जाताना प्रत्येक वारकरी स्त्रीच्या डोक्यावर तुळशी वृंदावन दिसतेच, म्हणून तिला देवत्व बहाल केले. तुळस बहुगुणी आहे. विसपुते हे चोपडा येथील विवेकानंद विद्यालयात कलाशिक्षक असून त्यांनी आषाढी एकादशीनिमित्त छोट्याशा तुळशी पत्रावर ऍक्रेलिक कलरच्या सहाय्याने 30 मिनिटात अवघ्या वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत मायबाप विठ्ठलाचे चित्र व पांडुरंग हे अक्षरचित्र साकारले त्यांच्या या नावीन्यपूर्ण कल्पकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.