अमळनेर:- तालुक्यातील विविध सहकारी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा मराठा समाज तर्फे ३ जुलै रोजी मराठा मंगल कार्यलयात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, खान्देश शिक्षण मंडळ व अर्बन बँक आदी संस्थांमध्ये निवडून आलेल्या चेअरमन , व्हॉईस चेअरमन व सर्व संचालकांचा, उत्कृष्ट पत्रकार संघ म्हणून पुरस्कार मिळवणारा अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांचा सत्कार ३ रोजी दुपारी १ वाजता आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, माजी आमदार डॉ बी एस पाटील, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, माजी नगराध्यक्ष प्रभाकर पाटील, प्रा लीलाधर पाटील उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष जयवंतराव पाटील व समाजातर्फे करण्यात आले आहे.