
एकाचा जागीच मृत्यू, तर इतर दोन जण गंभीर जखमी…
अमळनेर:- अमळनेर ते धार रस्त्यावर चारचाकीने झाडाला धडक दिल्याने एकाचा मृत्यू तर दोन गंभीर झाल्याची घटना काल ११ रोजी रात्री ९:३० वाजेच्या दरम्यान घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ११ रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास अमळनेर कडून धार कडे जात असलेल्या वेगात असलेल्या चारचाकी गाडीने हॉटेल चिन्मय जवळ वळणावर झाडाला धडक दिली. त्यात मालपुर येथील योगेश पांडुरंग पवार याचा जागीच मृत्यू झाला असून इतर दोन जण जागीच जखमी झाले आहेत. जखमींपैकी एक जण सुरत येथील असून दुसरा मालपुर येथील रहिवाशी आहेत. दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांचेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. रात्री उशिरापर्यंत अमळनेर पोलिसांत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.







