विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह फ्री कोचिंग क्लासेस…
अमळनेर:- सालाबादप्रमाणे सामाजिक बांधिलकी म्हणून अमळनेर तालुक्यातील वेगवेगळ्या शाळेतील पाच गरजू, होतकरू व गरीब विद्यार्थ्यांची अमळनेर क्लासेस संघटनेने शैक्षणिक जबाबदारी उचलली आहे.
सदरील 5 विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थ्यांचे पितृछत्र हरपलेले आहे. सर्वच विद्यार्थी अमळनेर येथील महाविद्यालय, विद्यालय येथे शिक्षण घेतात. मनिष पाटील,अमळनेर (इ.11वी), अनिता पावरा, मंगरूळ (इ.10वी), मेहुल विसपुते, तांबेपुरा (इ.9वी), गौरव चौहान, पिळोदे (इ.7वी), कल्याणी भोई,पैलाड(इ.7वी) या विद्यार्थ्यांना एका वर्षभरासाठी फ्री कोचिंग देण्यात येईल. या विद्यार्थ्यांकडून क्लास फी चे कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही व वर्षभर सर्वांना शैक्षणिक साहित्य देण्यात येईल अशी अधिकृत घोषणा उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या कार्यालयात क्लासेस संघटना अध्यक्ष भैय्यासाहेब मगर यांनी केली.यावेळी महादेव खेडकर यांच्या हस्ते सदरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. यावेळी क्लासेस संघटनेचे अध्यक्ष भैय्यासाहेब मगर, संजय पाटील, महेश बढे, किरण माळी, सोनल जोशी मॅडम, परेश गुरव उपस्थित होते.