
मंगळग्रह मंदिरावरील घटना, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल…
अमळनेर:- मंगळग्रह मंदिरावर दर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातून दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २५ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.
नारायण खोडके व जयश्री खोडके हे दाम्पत्य दिनांक २५ रोजी मंगळग्रह मंदिरावर दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी गर्दीत चोरट्याने जयश्री यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरून नेली. अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.







