
संस्थेच्या वादातून कर्मचारी वेठीस, मंत्री अनिल पाटील यांना साकडे…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित तीन शाळेतील सुमारे ४० कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून वेतन नसल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. संस्थेच्या वादामुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिक्षण विभागाने का वेठीस धरले ? म्हणून कर्मचाऱ्यांनी मंत्री अनिल पाटील यांना साकडे घातले.
मारवड येथील ग्रामविकास शिक्षण मंडळाच्या मारवड येथील सु हि मुंदडे हायस्कूल व श्रीमती द्रौ फ साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय, करणखेडे येथील वि या पाटील माध्यमिक विद्यालय व डांगरी येथील न्यू इंग्लिश स्कूल अशा तीन शाळा असून मारवड व करणखेडे येथील मुख्याध्यापक निवृत्त झाले असल्याने एका कार्यकारणीने एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करून मान्यतेसाठी प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवला आहे. समांतर कार्यकारिणीने देखील शिक्षकांचा प्रस्ताव शिक्षणाधिकारीकडे पाठवला असल्याने संस्थेच्या या वादात मुख्याध्यापक पदाला मान्यता मिळत नसल्याने गेल्या तीन महिन्यांपासून सुमारे ४० वेतन रोखण्यात आले आहे. वेतन नियमित करण्यात यावे अशी मागणी घेऊन शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मंत्री अनिल पाटील यांना साकडे घातले. त्याच प्रमाणे मुख्याध्यापक संघटनेचे व पतपेढी संचालक तुषार बोरसे ,माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील यांच्याकडेही कर्मचाऱ्यांनी व्यथा मांडली. मंत्री पाटील यांनी शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्याशी चर्चा करतो आणि कर्मचाऱ्यांना वेठीस धरू नये याबाबत सूचना देतो असे आश्वासन दिले. निवेदनावर लक्ष्मीकांत सैंदाणे, संजय बागुल, सुरेश मोरे, संजय सैंदाने, दीपक पाटील, योगेश पाटील, प्रीतम सोनवणे, सुरेश वाडीले, योगेश पाने, जानकीराम पाटील ,स्वाती आराळे ,जयश्री साळुंखे ,मेघा पवार, शरद साळुंखे ,प्रदीप साळुंखे, रमेश पवार ,सचिन साळुंखे, संजय साळुंखे, महेश पाटील, निलेशकुमार साळुंखे, प्रभाकर साळुंखे, राजेंद्र बागुल, दीपक शिसोदे, निलेश शर्मा, राकेश पवार, प्रतिभा सोनवणे , श्रीकृष्ण चव्हाण, राजेंद्र शिंदे, नंदकिशोर पवार, साहेबराव पाटील, आंनदा धनगर ,अजय पांडे, मुरलीधर चव्हाण , प्रशांत पाटील, कल्पना सुर्यवंशी, अर्चना सोनवणे, राजेंद्र सोनवणे, किशोर शिसोदे, वैशाली पाटील आदींच्या सह्या आहेत.
प्रतिक्रिया…
मुख्याध्यापक पदाला मान्यता केव्हाही मिळो मात्र शिक्षक म्हणून व काम करीत असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन रोखणे अन्यायकारक आहे. कामाचा मोबदला वेळेत मिळालाच पाहिजे.
:- तुषार बोरसे, शिक्षक नेते अमळनेर







