
विद्यार्थ्यांना मोफत रक्तगट तपासणी व नागरिकांसाठी शुगर तपासणी…
अमळनेर:- ॲक्लाप संघटनेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील संघटनेच्या लॅबमध्ये विद्यार्थ्यांना मोफत रक्तगट तपासणी व नागरिकांसाठी शुगर तपासणी करण्यात येणार आहे.
तालुक्यातील ॲक्लाप संघटनेच्या अधिकृत लॅबोरेटरी धारक सदस्यांनी संघटनेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेर शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत रक्तगट तपासणी व अमळनेरकर नागरिकांसाठी एका वेळेची शुगर तपासणी मोफत ठेवण्यात आली आहे. अमळनेर तालुक्यातील महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलचे अधीकृत लॅबोरेटरी धारकांकडे या तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. अमळनेर तालुक्यातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघटनेच्या सदस्यांकडून करण्यात आले आहे. दिनांक १० ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हे शिबिर आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




