वावडे येथील घटना, मारवड पोलिसांत तक्रार दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील वावडे येथे गल्लीत लावलेली चारचाकी बोलेरो गाडी अज्ञात चोरट्यांनी रात्रीतून चोरुन नेल्याची घटना दिनांक १० रोजी रात्री घडली आहे.
तालुक्यातील वावडे येथील प्रकाश ज्ञानेश्वर धोबी यांच्या वडिलांच्या मालकीची एम एच १९ एएक्स ००१७ क्रमांकाची महिंद्रा बोलेरो गाडी ही गावातील जवखेडा रस्त्यावरील श्रीकृष्ण मंदिराजवळ दिनांक १० रोजी रात्री १० वाजता लावलेली होती. फिर्यादी प्रकाश हे सकाळी त्याठिकाणी गेले असता त्यांना गाडी जागेवर दिसून न आल्याने त्यांनी गावपरिसरात शोध घेतला मात्र कोणताच तपास न लागल्याने गाडी चोरट्याने चोरुन नेल्याची खात्री झाल्याने त्यांनी मारवड पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. मारवड पोलीसात कलम ३७९ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ भरत श्रीराम ईशी हे करीत आहेत.
Related Stories
December 22, 2024