अमळनेर:- ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून अमळनेरात १९ ग्रंथपालांचा पुस्तक देवून सन्मान करण्यात आला.
ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या जयंती निमित्ताने साजरा होणारा ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून शहरातील सार्वजनिक ग्रंथालये महाविद्यालये व शाळांमध्ये जाऊन ग्रंथपाल दिनानिमित्त त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या १९ ग्रंथपालांना राष्ट्रसंत गाडगेबाबांचे मानव सेवा योगी संत गाडगे महाराज हे प्रा. डॉ रंजनीताई लुंगसे लिखित पुस्तिका देऊन डेबुजी झिंगराजी जाणोरकर ( संत गाडगेबाबा )ग्रंथालयाचे अध्यक्ष दिपक उखर्डु वाल्हे यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. अमळनेर युवा परीट धोबी मंडळ व पूज्य साने गुरुजी ग्रंथालय वाचनालय अमळनेर यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अनमोल असे सहकार्य लाभले.
Related Stories
December 22, 2024