तृणधान्य वर्षानिमित्त अमळनेर कृषी विभागातर्फे राबविले जाताय विविधोपक्रम…
अमळनेर:- आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त अमळनेर कृषी विभागातर्फे विविध उपक्रम राबविले जात असून नंदगाव व वावडे येथे विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक आहाराबद्दल जनजागृती करण्यात आली.
वावडे येथील बी.बी.ठाकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे दि. १२ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक आहाराबद्दल जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच निबंध स्पर्धा देखील घेण्यात आली निबंध स्पर्धेत पात्र विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.त्यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी सहाय्यक निशा सोनवणे यांनी केले. कृषी पर्यवेक्षक अमोल कोठावदे यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व व त्याचे आपल्या शरीराला होणारे फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद पाटील यांनी केले .उपस्थित मान्यवर मुख्याध्यापक सुनील पाटील, व्ही.एम. पाटील, भाग्यश्री साळवे, पी.एस.पवार, जे.बी. राजपुत, आर.आर.पारधी व पी.एस.पाटील, राजेंद्र प्रल्हाद पाटील, प्रभाकर चिंतामण पाटील, राजेंद्र अभिमन वानखेडे, रामकृष्ण निंबा पाटील, वाल्मीक शिवाजी पाटील उपस्थित होते.
मंडळ कृषी अधिकारी पातोंडा यांच्यामार्फत नंदगाव येथे विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य जागृती सप्ताह साजरा करण्यात आला. नंदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ही जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच निबंध स्पर्धा घेण्यात येवून पात्र विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.त्यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी सहाय्यक मालू बेडसे यांनी केले. कृषी पर्यवेक्षक योगेश वंजारी यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व व त्याचे आपल्या शरीराला होणारे फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज माळी यांनी केले.उपस्थित मान्यवर मुख्याध्यापक रमेश पारधी, भगवान सूर्यवंशी, रमेश दत्तू पाटील ज्येष्ठ नागरिक अरुण मोरे,भावना बेहरे,पृथ्वीराज रतन पाटील,निलेश साळुंखे ग्रामसेवक ज्ञानेश्वर पाटील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, नंदलाल संतोष पाटील,संतोष लोटन पाटील इत्यादी नागरिक उपस्थित होते.