
स्पर्धा परीक्षेत यशस्वी तरुणांचा ग्रामविकास शिक्षण मंडळातर्फे सत्कार…
अमळनेर:- तालुक्यात मंगरूळ येथे दहावीला प्रथम आलेल्या योगिता पाटील व नेहा पाटील या विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर गावातील अग्निवीर म्हणून देशसेवेत गेलेल्या व स्पर्धा परीक्षेत निवड झालेल्या तरुणांचा ग्रामविकास शिक्षण मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.
विविध कार्यकारी सोसायटीत देविदास विश्वास पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायतीत माजी सैनिक सयाजीराव गणेश पाटील यांच्या हस्ते स्व. अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात मुरलीधर दंगल पाटील यांच्या हस्ते जिप प्राथमिक शाळेत शालेय समिती अध्यक्ष दीपक भगवान पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्रीकांत पाटील, संजीव सैंदाने, अमोल पाटील, वाल्मिक पाटील, विश्वास पाटील, चंपालाल शिंदे, संदीप पाटील, निंबा पाटील, रतीलाल पाटील, डिंपल पाटील हजर होते.







