अमळनेर:- तालुक्यातील रणाईचे येथील रहिवासी तसेच सध्या गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त अति संवेदनशील व अति दुर्गम असलेल्या ठिकाणी केलेल्या उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरीसाठी पीएसआय सतिश वामन पाटील यांना 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती, भारत सरकार यांचे पोलीस शौर्य पदक जाहीर झाले आहे.
पीएसआय सतिश पाटील हे गेल्या 2 वर्षांपासून विशेष अभियान पथक (C 60), गडचिरोली येथे कार्यरत आहेत. गडचिरोली जिल्हा हा नक्षल दृष्ट्या अति संवेदनशील व दुर्गम असल्याकारणाने त्या ठिकाणी C 60 कडून सतत नक्षल विरोधी अभियान राबविण्यात येत असते. त्यादरम्यान झालेल्या नक्षल चकमकीदरम्यान केलेले उत्कृष्ट पथक नेतृत्व व केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पीएसआय सतिश पाटील यांना गडचिरोली पोलीस तसेच महाराष्ट्र पोलीस दलासाठी सर्वोच्च व मानाचे समजले जाणारे मा. राष्ट्रपती, भारत सरकार यांचे पोलीस शौर्य पदक देण्यात येणार आहे.