पोलिसांत विनयभंग व ॲट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल..
अमळनेर:- पोट दुखते म्हणून उपचारासाठी आलेल्या महिला पेशंटचा विनयभंग झाल्याची घटना २३ रोजी दुपारी साडे तीन वाजता नर्मदा फाउंडेशन येथे घडली असून अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील धानोरा येथील माहेर असलेल्या एका महिलेचे १०-१२ दिवसांपासून पोट दुखत असल्याने ती धुळे येथील गणपती पॅलेस समोरील दवाखान्यात गेली होती. तेथे सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला अँपेंडिक्स सांगितले व अमळनेर येथे डॉ अनिल शिंदे यांच्या नर्मदा फाउंडेशनमध्ये पाठवले. दिनांक २३ रोजी दुपारी साडेतीन वाजता महिला उपचार घेताना डॉक्टरांनी तिचा विनयभंग केला व ती अनुसूचित जमातीची असल्याने तिच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला डॉक्टरांविरुद्ध विनयभंग व अट्रोसिटी कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास डीवायएसपी सुनील नंदवाळकर करीत आहेत.