साने गुरुजी विद्यालयात आदरांजली सभा संपन्न…
अमळनेर:- येथील साने गुरुजी विद्यालय शाळेचे संस्थापक स्वर्गीय माजी आमदार बापूसाहेब साथी गुलाबराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत आदरांजली सभा संपन्न झाली.
अध्यक्षस्थानी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव दादासाहेब संदीप घोरपडे होते. शोकसभेसाठी नानासाहेब डॉक्टर राजेंद्र काशिनाथ निकम, भारती राजेंद्र निकम, अर्बन बँकेचे तज्ञ संचालक ॲड व्ही. आर. पाटील, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सहसचिव ॲड नानासाहेब अशोक बाविस्कर, प्रकाश निकम, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल पाटील, साने गुरुजी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते. यावेळी स्वर्गीय बापूसाहेब साथी गुलाबराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. ॲड व्ही आर पाटील यांनी संवेदना व्यक्त करताना सांगितले की, बापू एक दिलदार व बहु आयामी व्यक्तिमत्व होते. संस्थेचे शिक्षक प्रतिनिधी विलास चौधरी यांनी संवेदना व्यक्त करताना सांगितले की, बापूसाहेबांनी अनेक दिन दलितांना न्याय देण्याचे काम केले. मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी संवेदना व्यक्त करताना सांगितले की, बापूसाहेबांनी संस्थेतील कर्मचाऱ्यांवर मुलाप्रमाणे प्रेम केले, मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी सांगितले की, बापूसाहेब शिस्तप्रिय व समाजाचे बाबा होते. ॲड अशोक बाविस्कर यांनी सांगितले की, बापूंनी अनेक वाईट गोष्टींवर प्रहार करण्याचे काम केले. अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना दादासाहेब संदीप घोरपडे यांनी सांगितले की, बापूंचे समाजाबरोबर शाळेवर नितांत प्रेम होते. तसेच शाळा स्थापन करताना बापूंनी शिक्षकांचा विचार केला. माझ्या शेतकऱ्याचा मुलगा शिक्षक झाला पाहिजे व त्याच्यावर कोणताही अन्याय होता कामा नये याची खबरदारी बापूंनी घेतली. कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता साने गुरुजींची प्रार्थना खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे या कवितेने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक डी ए धनगर यांनी केले.