
३ सप्टेंबर रोजी शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांशी साधणार संवाद…
अमळनेर:- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ५ सप्टेंबरच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार आणि रोहित आर पाटील अमळनेर तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून ते शेतकरी ,कामगार , कष्टकरी यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्याम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खा. शरद पवार हे दिनांक ५ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या सभेला अमळनेर तालुक्यातून सुमारे पाच हजार कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी दिली. दौरा यशस्वी करण्यासाठी व पूर्वतयारी करण्यासाठी आ. रोहित पवार व रोहित आर पाटील ३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार असून विविध शेताच्या बांधावर आणि इतर ठिकाणी भेटी देणार असून शरद पवार यांच्या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करणार आहेत. त्यानंतर ते पारोळा येथे जाणार आहेत नंतर ते माजी आमदार गुलाबराव पाटील यांच्या द्वारदर्शनाला जाणार आहेत. पत्रकार परिषदेस प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील, प्रदेश समन्वयक रिटा बाविस्कर, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष श्याम पाटील, हर्षा चित्ते, अरुण शिंदे, डॉ किरण पाटील, मनोहर पाटील,सचिन वाघ हजर होते.




