अयोध्या निवासी श्री गायत्री नंदनजी महाराजांचे झाले आगमन…
अमळनेर:- शहरात गोकुळाष्टमीच्या पावन पर्वानिमित्त श्रीमद भागवत कथा प्रेम यज्ञचे भव्य आयोजन दि 1 ते 11 सप्टेंबर दरम्यान करण्यात आले असून अयोध्या निवासी श्री गायत्री नंदनजी महाराजांच्या अमृतवाणीतून ही कथा होणार आहे.तर श्रीराम कथा मर्मज्ञ अयोध्या निवासी श्री सोनू पुजारीजी महाराज कथन करणार आहेत.
काल रोजी श्री गायत्री नंदन महाराजांचे आगमन झाल्यानंतर सकाळी श्री स्वामीनारायण मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. तत्पूर्वी माजी जि. प. सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते स्वामीनारायण मंदिरात पोथी पूजन व व्यासपूजन होऊन त्यानंतर श्री गायत्री नंदन महाराज रथावर विराजमान झाल्यानंतर शोभायात्रेस सुरुवात झाली. यावेळी असंख्य महिला भगिनी डोक्यावर कलश व लाल साडी परिधान करून सहभागी झाल्या होत्या. तर बजरंगलाल अग्रवाल, विनोद अग्रवाल,ऍड विवेक लाठी, श्री सोनी,चेतन राजपूत यासह असंख्य मान्यवर यात्रेत सहभागी होती. सदरची शोभायात्रा वाजतगाजत नगरपालिका, निकुंभ हाईट्स, टिळक चौक, मंगलमूर्ती पतपेढी मार्गे भागवत कथा स्थळी पोहोचून तेथे समारोप करण्यात आला. दरम्यान सदरची श्रीमद भागवत कथा दररोज दुपारी 2 ते 6 वाजे दरम्यान प्रताप मिल कंपाऊंड, प्रमुख पेट्रोल पंप शेजारी, गलवाडे रोड,अमळनेर येथे होणार आहे. अमळनेर शहरातील समस्त भक्त गणांनी ही कथा आयोजित केली असून कथा निवेदक अमळनेर येथील भागवत भक्तगण आहेत. दरम्यान शनिवार दि 2 रोजी कथा सूत शौनक संवाद,3 रोजी श्री शुकदेव चरित्र,4 रोजी कपिल व्याख्यान शिव विवाहाची कथा,5 रोजी प्रल्हाद चरित्र वामन अवतार, 6 रोजी श्रीकृष्ण जन्म,7 रोजी माखन चोरी मटकी फोड,8 रोजी छप्पन भोग,9 रोजी रुक्मिणी मंगल,10 रोजी सुदामा चरित्र, शुकदेव बिदाई,11 रोजी विष्णू महायज्ञ हवन आदी कार्यक्रम या कथा सप्ताहात होणार आहे. कथा स्थळी संपुर्ण जय्यत तयारी करण्यात आली असून सर्व भक्तगणांनी कथा श्रावणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.