अमळनेर तालुका तलाठी संघाने पुकारले काम बंद आंदोलन…
अमळनेर:- यावल येथील महिला मंडळ अधिकाऱ्यावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अमळनेर तालुका तलाठी संघाने निषेध करून काम बंद आंदोलन पुकारले आहे.
प्रांताधिकारी महादेव खेडकर व तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना तलाठी संघाने निवेदन दिले असून दिनांक ३१ ऑगस्ट रोजी यावल येथे महिला मंडळ अधिकारी बबिता चौधरी यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला करत जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सदर घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करणे आवश्यक असताना अद्याप आरोपी मोकाट आहेत. त्यामुळे आरोपींना अटक करण्यात येत नाही तोपर्यंत अमळनेर तालुका तलाठी संघटनेने काम बंद आंदोलन पुकारले आहे. फक्त निवडणूक व नैसर्गिक आपत्ती कामकाज करू बाकीची सर्व कामे व दाखले देणे बंद राहील असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर तलाठी संघटनेचे अध्यक्ष गणेश महाजन, कार्याध्यक्ष स्वप्नील कुलकर्णी, व्ही पी पाटील, पुरुषोत्तम पाटील, प्रथमेश पवार,आशिष पारध्ये, शीतल पाटील, धीरज देशमुख, गौरव शिरसाठ, ए बी सोनवणे, ज्योती गुसुंगे, भोसले, तिलेश पवार, एम आर पाटील, महेंद्र पाटील, महेंद्र भावसार, मंडळाधिकारी गिरासे यांच्या सह्या होत्या. आज दिवसभर तलाठ्यांनी लॉगिन केले नाही. काम बंदमुळे अनेकांना अडचणी आल्या.