सानेगुरुजी शाळेत आयोजित शोकसभेत मान्यवरांची उपस्थिती…
अमळनेर:- माजी आमदार स्वर्गीय गुलाबराव बापू पाटील यांचे नुकतेच दुःखद निधन झाल्याने त्यांना तालुक्याच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन सानेगुरुजी विद्या मंदिरातील एस.एम.जोशी सभागृहात करण्यात आले होते,यावेळी अध्यक्षस्थानी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील, प्रतिभा शिंदे यासह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते.
सुरवातीला बापूंच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण होऊन सभेला सुरुवात झाली बापूंच्या आठवणींना उजाळा देताना नामदार अनिल पाटील पुढे म्हणाले की, कधीतरी आपल्याला जायचे ही मानसिकता बापुनी स्वतःच केली होती. बापुनी मला मदत केली नसती तर माझे राजकीय पूनर्वसंन झाले नसते,मला मार्केटचा सभापती बनवायचे असा पहिला निरोप बापुनीच मला दिला होता, आणि मी झालो देखील तेव्हा पासून माझ्या राजकीय जीवनाला खरी सुरुवात झाली,प्रत्येक टप्प्यावर त्यांनी मला मदतच केली,नेता असा असावा जे बोललो त्यावर ठाम राहतो याच पद्धतीचे बापू होते,आता अनेकांमध्ये तशी राजकीय विश्वासार्हता दिसत नाही,कार्यकर्ते कसे सांभाळायचे ते कसब बापूंमध्ये होते,बापूंची खरी शिदोरी कार्यकर्ते होते,ज्या ज्या ठिकाणी राज्यात बापू जात तेथे लाल टोपी म्हणून त्यांची ओळख होती,सभेत बोलताना बापू इंटरवेल करायचे राज्यात असे ते एकमेव नेते होते,जनतेची बाजू मांडण्याचे कौशल्य त्यांच्यात असल्याने त्यांचे भाषण ऐकण्यासाठी गर्दी होत असे, त्याकाळी विदारक परिस्थितीत ज्या पद्धतीने अमळनेर आणि येथील जनतेची सेवा केली ती निश्चितच कौतुकास्पद आहे,संपूर्ण राज्य व अमळनेर मतदारसंघाच्या वतीने थोर नेत्यास त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी,खा शि मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे, माजी जि प सदस्य शांताराम पाटील,भटू पाटील, भारती गाला, धनगर दला पाटील, डि.एम.पाटील, अरुण देशमुख, संजय भास्कर पाटील चाळीसगाव, संजय पाटील, रणजित शिंदे, भास्कर बोरसे, एस एम पाटील, डॉ.रामू पाटील, बहिरम सर, जयवंतराव पाटील, सुरेश पिरन पाटील, प्रदीप पाटील चोपडा, अशोक पाटील, माजी आ.दिलीप सोनवणे यांनी भावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी बापूंच्या आठवणी विशद करून समारोप केला सूत्रसंचालन प्रा.अशोक पवार यांनी केले.
बापूंच्या नावाने पुरस्कार जाहीर…
यावेळी गुलाबराव बापूंच्या नावाने उत्कृष्ट पत्रकार, नेता, कार्यकर्ता, वक्ता पुरस्कार दरवर्षी स्मृतिदिनी देणार तसेच त्यांचे विधानसभेतील भाषणांचे पुस्तक तयार करून उपलब्ध करून देणार अशी घोषणा युवा कल्याण प्रतिष्ठानच्या वतीने प्रा अशोक पवार यांनी केली. यावेळी अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, मुख्याध्यापक सतीश देशमुख, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील,सचिव संदीप घोरपडे, संचालक गुणवंतराव पाटील,ऍड अशोक बाविस्कर,अशोक बिऱ्हाडे यासह शिक्षक वृंद आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.