मंत्री पाटील यांच्या प्रयत्नांनी ३८ गावात होणार विकासकामे…
अमळनेर:- शहरातील रस्त्यांसाठी नामदार अनिल भाईदास पाटील यांनी नुकताच 10 कोटी निधी मंजूर केला असताना आता ग्रामिण भागालाही त्यांनी न्याय देत सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून 5 कोटीच्या विकासकामांना मंजुरी मिळवली असून यामाध्यमातून 38 गावांमध्ये आवश्यक ती विकासकामे होणार आहेत.
मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर नामदार अनिल पाटील राज्याची जवाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळत असताना आपल्या मतदारसंघास आमदार म्हणून न्याय देण्यासाठी विकासकामांचा सपाटा सुरू केला आहे.राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडे विकास कामाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केल्यानंतर नामदार पाटील यांनी यशस्वी प्रयत्न केल्याने सुमारे 5 कोटींच्या कामांना या विभागाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय दि. 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला असून यातील कामांना निधी देखील प्राप्त झाला आहे, सदर निधीतून ग्रामिण भागात रस्ता काँक्रीटीकरण, सामाजिक सभागृह, संरक्षण भिंत, स्मशानभूमी, पेव्हर ब्लॉक,गटार बांधकाम यासारखी कामे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या परिसरात होणार आहेत. सदर निधीच्या मंजुरीबद्दल नामदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री ना एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, ना अजित पवार, पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत. तर संबंधित गावांच्या ग्रामस्थानी नामदार अनिल पाटील यांचे आभार मानले आहेत.
या गावात होणार ही विकासकामे…
मौजे पिंपळकोठा ता. पारोळा येथे बौध्द विहार बांधकाम करणे रक्कम १५.०० लाख, मौजे गंगापुरी ता. अमळनेर येथे संरक्षण भिंत बांधकाम करणे रक्कम १५.०० लाख, मौजे जिराळी ता. पारोळा येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे रक्कम १०.०० लाख, मौजे जुनोने ता. अमळनेर येथे बौध्द विहार बांधकाम करणे रक्कम १५.०० लाख, मौजे ढेकु खु ता. अमळनेर येथे गटार कॉक्रीटीकरण करणे रक्कम १५.०० लाख, मौजे खौशी ता. अमळनेर येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे रक्कम १०.०० लाख, मौजे सावखेडा ता. अमळनेर येथे बौध्द विहार बांधकाम करणे रक्कम १५.०० लाख, मौजे मांडळ ता. अमळनेर येथे येथे बौध्द विहार बांधकाम करणे रक्कम २०.०० लाख, मौजे मांडळ ता. अमळनेर येथे आण्णाभाऊ साठे चौक सुशोभिकरण करणे रक्कम ५.०० लाख, मौजे दळवेल ता.पारोळा येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे रक्कम १०.०० लाख, मौजे भोलाणे ता. पारोळा येथे प्रवेशद्वार बांधकाम करणे रक्कम १५.०० लाख, मौजे शिरसोदे ता. पारोळा येथे बौद्ध विहार बांधकाम करणे रक्कम २०.०० लाख, मौजे द. सबगव्हाण ता. पारोळा येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे रक्कम १०.०० लाख, मौजे पिळोदा ता. अमळनेर येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे रक्कम १०.०० लाख, मौजे शेळावे बु ता. पारोळा येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम १०.०० लाख, मौजे कंकराज ता. पारोळा येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे रक्कम १०.०० लाख, मौजे माजर्डी ता. अमळनेर येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे रक्कम १०.०० लाख, मौजे दहिवद ता. अमळनेर येथे बौध्द विहार बांधकाम करणे रक्कम २०.०० लाख, मौजे नालखेडा ता. अमळनेर येथे संरक्षण भिंत बांधकाम करणे रक्कम १०.०० लाख, मौजें मेहरगांव ता. अमळनेर येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे रक्कम १०.०० लाख, मौजे वाघोदा ता.अमळनेर येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे रक्कम १०.०० लाख, मौजे जळोद ता. अमळनेर येथे प्रवेशद्वार बांधकाम करणे रक्कम १५.०० लाख, मौजे पातोडा ता.अमळनेर येथे बौध्द विहार बांधकाम करणे रक्कम २०.०० लाख, मौजे अमळगांव ता.अमळनेर येथे प्रवेशद्वार बांधकाम करणे रक्कम १५.०० लाख, मौजे कावपिंप्री ता. अमळनेर येथे प्रवेशद्वार बांधकाम करणे रक्कम १५.०० लाख, मौजे तळवाडे ता.अमळनेर येथे संरक्षण भिंत बांधकाम करणे रक्कम १५.०० लाख, मौजे पाडसे ता. अमळनेर येथे बौध्द विहार बांधकाम करणे रक्कम १५.०० लाख, मौजे लोणपंचम ता. अमळनेर येथे बौध्द विहार बांधकाम करणे रक्कम १५.०० लाख, मौजे सारवेटे ता. अमळनेर येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे रक्कम १०.०० लाख, मौजे इंदापिंप्री ता. अमळनेर येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे रक्कम १०.०० लाख, मौजे हिंगोणे खु प्र. ज. ता.अमळनेर येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे रक्कम १५.०० लाख, मौजे कळमसरे ता. अमळनेर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे रक्कम १०.०० लाख, मौजे सबगव्हाण ता. अमळनेर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे रक्कम १०.०० लाख, मौजे कुन्हे खु ता. अमळनेर येथे भुमिगत गटार बांधकाम करणे रक्कम १०.०० लाख, बंगाली फाईल अमळनेर ता. अमळनेर येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे रक्कम ३०.०० लाख, मौजे पाडळसरे ता. अमळनेर येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे रक्कम १०.०० लाख, मौजे दहिवद ता. अमळनेर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे रक्कम १०.०० लाख, मौजे चौबारी ता. अमळनेर येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे रक्कम १०.०० लाख