विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीसह सामाजिक कार्यकर्त्यांशी चर्चा…
अमळनेर:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आ.रोहित पवार यांनी सामाजिक कार्यकर्ते,अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे यांच्या आर.के.नगर येथील निवासस्थानी भेट देवून विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीसह सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांशी चर्चा केली. अमळनेर येथे होणाऱ्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला यायला आवडेल असे आ.रोहित पवार यांनी याप्रसंगी सांगितले.
आ.रोहित पवार यांनी ‘मा.शरद पवार हे नेहमी विद्रोही चळवळीबाबत, फुले शाहू आंबेडकरी विचारांबाबत आम्हाला सांगत असतात. आम्ही ही प्रस्थापितांच्या विरोधात विद्रोह व संघर्ष करणारे कार्यकर्ते असून विद्रोहीची संमेलनाची जय्यत तयारी पहाता साहित्य चळवळीची भूमिका व संमेलन अनुभवण्यासाठी आम्हाला संमेलनाला यायला आवडेल’, असे यावेळी सांगितले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांसह रोहित पवार यांचे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सामूहिक स्वरूपात स्वागत केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता प्रशिक्षक विलास लवांडे, जळगांव निरीक्षक प्रसन्नजित पाटील आदींसह अमळनेर येथे येणाऱ्या काळात विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे भव्य आयोजन होणार आहे या पार्श्वभूमीवर संमेलनासाठी काम करणाऱ्या विविध सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांसह, प्रमुख पदाधिकारी यांचेशी संवाद साधला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा अशोक पवार यांनी, सामाजिक चळवळींचा उपयोग हा पुरोगामी विचारांच्या राजकीय शक्तींना होत असतो मात्र राजकीय शक्तीनींही सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी पाठबळ उभे करायला हवे, असे सांगितले. नगरसेवक शाम पाटील, साने गुरुजी स्मारक समितीच्या दर्शना पवार, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रेमराज पवार, गौतम मोरे, अशोक बिऱ्हाडे, डी.ए.पाटील, कैलास पाटील, वाल्मिक पाटील, अशोक पाटील, दिपक काटे, रियाज मौलाना, राजमुद्रा फाउंडेशन चे अक्षय चव्हाण आदिंनी विद्रोही साहित्य संमेलनाचे पत्रक आ.रोहित पवार यांना दिले व चर्चा केली.तर याप्रसंगी शरद पाटील, देवदत्त संदानशिव, डॉ.सुरेश खैरनार, केतन पाटील, विक्रम शिंदे, दिपक संदानशिव, दिपक पवार, प्रथमेश पाटील, जेष्ठ कार्यकर्ते मधुकर पाटील, आनंदा पाटील,भावेश पाटील, दिपक बिऱ्हाडे आदींसह चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.