
अमळनेर:- गेली चार दशक नाट्य आणि अहिराणी चित्रपट सृष्टीच्या माध्यमातून आणि दिग्दर्शनातून नाट्यसेवा करणारे जेष्ठ रंगकर्मी व दिग्दर्शक आत्माराम (आण्णा) एलजी पाटील यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी करणखेडे ता. अमळनेर येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले.

अहिरानीतील चंदन सटीना टाक आदी अहिराणी चित्रपटात भूमिकाही त्यांनी साकारल्या होत्या तसेच माझी जमीन, घराण्याचा न्याय दंड, रक्तात रंगली नाती आदी नाटकांचे नाट्यदिग्दर्शन व अभिनय केला होता. खानदेशातील नाट्यसृष्टीच्या सुवर्णकाळाचे ते साक्षीदार होते. त्यांच्या मार्गदर्शनात अनेक नाट्य कलावंत त्यांच्या तालमीत उदयास आले. त्यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टी आणि अहिराणी चित्रपट सृष्टीत न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे.




