खेडी व्यवहारदळेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून सभा संपन्न…
अमळनेर:- लालबावटा शेतमजुर युनियन सभासद नोंदणी अभियान सुरू करण्याची माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून खेडी व्यवहारदळे येथे घेण्यात आलेल्या सभेत देण्यात आली
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड ज्ञानेश्वर पाटील, तालुका सचिव कॉम्रेड वाल्मीक मैराळे, कुर्हे खु. सरपंच कॉम्रेड निलाबाई अभिमन भिल यांच्या नेतृत्वात आणि सरपंच बापू जंगलू भिल यांच्या अध्यक्षतेखाली खेडी व्यवहारदळ येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून सभा घेण्यात आली भारतीय खेतमजदुर युनियन संलग्न शेतमजुर युनियन सदस्य नोंदणी करण्यात आली. तसेच शेतमजुरांच्या अडचणी मांडण्यात आल्या. कॉम्रेड ज्ञानेश्वर पाटील यांनी त्यावर सविस्तर माहिती दिली. यावेळी दुष्काळ जाहीर करावा, शेतमजुरांना यांना जॉब कार्ड देवून रोजगार हमीचे काम उपलब्ध करावेत, 55 वर्षे वयावरील शेतकरी शेतमजुर यांना पेंशन मिळावे असे ठराव करण्यात आले. सभेत भारतीय कम्युनिस्ट पक्ष शाखा सेक्रेटरी व शेतमजुर युनियन अध्यक्ष सचिव यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले. सभेत कॉम्रेड निलाबाई भिल, कॉम्रेड नारायण मैराळे,सरपंच बापू जंगलू भिल यांनी मनोगत व्यक्त केलेत.श्याम पारधी यांनी सभासद नोंदणी केली, कॉम्रेड वाल्मीक मैराळे यांनी बहुसंख्येने आलेल्या शेतमजुर व भारतीय कम्युनिस्ट पक्ष सभासद यांचे आभार मानले.