
कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत आयोजन…
अमळनेर:- कृषी विभाग,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत दिनांक ८ सप्टेंबर रोजी शहरातील टाऊन हॉल येथे कृषी पायाभूत सुविधा निधि योजना प्रचार-प्रसार प्रसिद्धी कार्यशाळा घेण्यात आली. तसेच रानभाज्याचे प्रदर्शन भरवण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषि अधिकारी सी. जे. ठाकरे यांनी केले. कार्यक्रमास नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झांबरे यांनी बँकेशी निगडित विविध प्रकारच्या योजना विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत बाळासाहेब ठाकरे कृषी संजीवनी प्रकल्प स्मार्ट बाबत माहिती दिली. उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर यांनी कृषी विषयक योजनांची माहिती दिली. समाधान पाटील यांनी विविध योजनांची सखोल माहिती दिली व प्रकल्प तयार करण्याबाबत महिती सांगितली. स्टेट बँकेचे प्रतिनिधी कार्तिक सर, सेंट्रल बँकेचे विलास पाटील यांनी 3 टक्के व्याज परतावा मिळण्यासाठी लागणारी माहिती सांगितली. अर्थतज्ञ तथा वित्त प्रवेश सल्लागार नितीन इंगळे, यांनी व्याज परतवा मिळण्यासाठी लागणारी कागदपत्रे बाबत माहिती दिली. कृषिपर्यवेक्षक योगेश वंजारी, दीपक चौधरी, अमोल कोठवदे, योगेश खैरनार, राकेश सोनवणे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली. मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. कृषि सहाय्यक राजेश बोरसे, निलेश पाटील अनिकेत सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तालुका तंत्र व्यवस्थापक भूषण पाटील यांनी केले.