अमळनेर:- तालुक्यातील सारबेटे खुर्द. येथे पंचायत समितीचे मा. सभापती श्याम अहिरे यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी सभापती यांनी शाळेची गुणवत्ता भौतिक सुविधा आणि नागरिकांचा विकास कामातील प्रत्यक्ष सहभाग, याबद्दल कौतुक केले.
याप्रसंगी श्याम अहिरे म्हणाले की गावातील नागरिकांचा जर असा सहभाग असला तर शिक्षकांचा उत्साह द्विगुणित होऊन शाळेतील विद्यार्थी गुणवाण व आदर्श तसेच उच्चविद्याविभूषित होऊ शकतात.
शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना महिरे यांनी शाळेतील विविध नवोपक्रम याबाबत माहिती सांगितली. शाळेतील शिक्षिका श्रीमती आशा महाजन यांनी विद्यार्थी विकासासाठी केले जाणारे विविध प्रयत्न व नागरिक यांचेही प्राप्त होणारे सहकार्य याबाबत काही अनुभव कथन केले.कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश विजय पाटील, तसेच सरपंच विलास संतोष पाटील, राजेश निंबाजी पाटील उपसरपंच ज्ञानेश्वर शांताराम पाटील, सदस्य किशन पाटील, युवराज पाटील, युवराज पाटील, ज्ञानेश्वर ब्रम्हे, देशमुख वंजारी, देशमुख राठोड, निळकंठ पा किसन पा. कैलास पा.सुभाष पा., मधुकर पा., किशोर पा., हंसराज पा., धर्मेद्र पा. दगडु बिऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास पाहुणे म्हणुन केंद्रप्रमुख सोनवणे सर व नुकतेच पी.एच.डी प्राप्त डाँ.कुणाल पवार सर मुख्याध्यापक ढेकु व किशोर पाटील तांत्रीक अधिकारी (रोहयो) पं.स.अमळनेर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी गावात शवपेटी लोकार्पण व कचरा कुंडी वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉक्टर कुणाल पवार यांनी केले.