अमळनेर:- तालुक्यातील तांदळी शिवारातील शेतातून मोटर व साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने मारवड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फिर्यादी शामकांत विक्रम ठाकरे रा. पढावद यांच्या तांदळी शिवारातील गट क्र. २४३/३ मधून दि. १२ तारखेच्या पूर्वी अज्ञात चोरट्याने १५ हजार किमतीची टेकस्मो कंपनीची मोटर, ५ हजार किमतीचा पाईप, १ हजार किमतीची केबल वायर असे साहित्य चोरून नेले आहे. त्यावरून मारवड पोलिसात भादवि कलम ३७९, ४२७ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो हे. कॉ. संजय पाटील करत आहेत.