
अमळनेर:- तालुक्यातील पाडसे येथे पोलिसांना फोन करून यात्रा बंद केल्याच्या संशयावरून महिला सरपंचांचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
प्रतिभा चिंतामण पाटील (सरपंच पाडसे) यांच्या फिर्यादीनुसार दि. १३ रोजी रात्री ८:३० वाजता राहत्या घरी असताना पोलिसांना फोन करून गावातील यात्रा बंद केल्याच्या कारणावरून गावातील निलेश पांडुरंग पाटील, रामकृष्ण भगवान कोळी या दोघांनी संगनमत करून घरात घुसून दोन्ही हात पकडून घराच्या बाहेर ओढून घेवून जात असताना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच फिर्यादी व त्याचे पतीस शिवीगाळ करत तुम्ही घराबाहेर निघा तुमचा काटा काढतो असा दम दिल्याने मारवड पोलिसात भादवि कलम ३५४, ४५२, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास स. फौज. बाळकृष्ण शिंदे करीत आहेत.




