बाजार समितीतील कार्यक्रमात आवेशात चुकीचे बोलले गेल्याचे केले कबूल…
अमळनेर:- बाजार समितीतील सत्कार कार्यक्रमात बोलण्याच्या ओघात चुकीचे शब्द बोलुन गेल्याचे कबूल करत संजय पवार यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. स्व. उदय वाघ यांच्याबद्दल चुकीचे शब्दप्रयोग केल्याने तालुक्यातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
सोशल मीडियावर त्यांनी संदेश पाठवत माजी आमदार स्मिता वाघ व स्व. उदयबापु वाघ प्रेमींची माफी मागितली आहे. दिनांक १० सप्टेंबर रोजी झालेल्या नामदार अनिल दादा पाटील यांच्या नागरी सत्काराप्रसंगी स्वर्गीय उदय बापू माझ्याकडून बोलण्याच्या ओघात चुकीचे बोलले गेले होते असे त्यांनी कबूल करत स्व. उदयबापूबद्दल माझ्या मनात कोणताही वाईट हेतू नव्हता तसेच आमचे संबंध खूप स्नेहाचे होते हे स्मिता ताई यांनाही माहीत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. माझ्या बोलण्यामुळे स्मिता वाघ व स्व.उदयबापू समर्थक सहकारी बंधू, मित्र परीवार यांच्या भावना दुखावल्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी म्हटले आहे.