मंत्री पाटील व मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते विजयी खेळाडूंचा झाला सत्कार…
अमळनेर:- राष्ट्रीय ओपन कराटे स्पर्धा भुसावळ येथे सेल्फ डिफेन्स स्पोर्टस असोसिएशन ऑफ इंडिया, शोतोकोन कराटे डू असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे दि. १० सप्टेंबर रोजी घेण्यात आल्या. यात विविध भागातून मोठ्या प्रमाणात खेळाडूंनी सहभाग नोंदविला, यात अमळनेरच्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवला.
मंत्री अनिल भाईदास पाटील व अमळनेर नगरपरिषदचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या शुभहस्ते सदर विजयी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. दक्ष प्रदिप पाटील, अरूण विनोद अमृतकर, निशांत विनोद पाटील, समंतक देवेंद्र देशमुख, मितलेश डिगंबर वाघ, वेदांत भुपेंद्र वानखेडे, हर्ष राजेंद्र सोनवणे, कृष्णा केतन गोसावी, लोकेश भुषण भामरे, प्रतिक दिनेश मोराणकर, पुर्वेश दिनेश मोराणकर, अतुल रामदास सुरणकर, कार्तिक विनोद पाटील, हरिष संदिप सोनवणे, अक्षत रवि वर्मा, मल्हार गणेश खरोटे, मानस कैलास साळुंखे, सिध्देश शाम पाटील, ईशांत मच्छिंद्र पाटील, अनिकेत बबन पाटील, सुदर्शन अशोक कोळी, तन्मय कैलास साळुंखे, आयुष हिमांशु शहा, अनुश्री मनोज चौधरी, तेजस्विनी विकास जाधव, दिव्यानी निवृत्तीनाथ पवार, हिंदवी विजय निकम, आर्या राजेंद्र देशमुख, भार्गवी प्रशांत सरोदे, पिहल सचिन पाटील, आराध्या रवि वर्मा, पुर्वेशी संजय पाटील, प्रियम प्रशांत शिंदे, सुकेशनी समाधान सपकाळे आदी सर्व यशस्वी खेळाडू व मास्टर सुशिल करंदीकर व प्रज्ञा करंदीकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले.