ग्रामीण भागात दोन रुग्ण, दोन नपा कर्मचारी ही आढळले बाधित…
अमळनेर:- तालुक्यात काल १७ कोरोना बाधीत आढळले असून ग्रामीण भागात दोन व शहरात १५ रुग्ण आढळून आले आहेत..
शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित आढळून येत असून काल ढेकु रोड परिसरातील पटवारी कॉलनी, रामवाडी, विद्या विहार कॉलनी, कुंटे रोड, पाठक गल्ली, एमएससीबी कॉलनी शहरी भागांत रुग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात करणखेडा व निंभोरा या गावात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहेत. याबरोबर नगरपालिकेतील दोन कर्मचारी बाधित आढळून आले आहेत. ही त्यामुळे एकंदरीतच शहरात संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरत असून एकूणच रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मास्क व सामाजिक अंतर राखणे या उपाययोजनांचा परत विसर पडल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. बाजारपेठेत, दुकानात तसेच अनेक शासकीय व खाजगी कार्यालयात कार्यालयात विनामास्क येणाऱ्याची संख्या अजूनही लक्षणीय आहे.