
तांदळी शिवारातील घटना, शेतकऱ्याचे लाखाचे नुकसान…
अमळनेर:- तालुक्यातील तांदळी शिवारातील शेतात इलेक्ट्रिक तारांच्या शॉर्टसर्किटमुळे ठिबक नळ्यांना आग लागून शेतकऱ्याचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
पढावद ता. शिंदखेडा येथील विक्रम काळू पाटील यांची तांदळी शिवारात शेती असून त्यात निलगिरीची रोपे लावली आहेत. त्यांना पाणी देण्यासाठी ठिबक नळ्या टाकण्यात आल्या आहेत. दि. २२ रोजी ९ वाजेच्या सुमारास शेतातून गेलेल्या इलेक्ट्रिक तारांच्या शॉर्टसर्किट होवून चिंग्या खाली पडून झाडाच्या पत्त्यांनी पेट घेतल्याने ठिबक नळ्या जळायला लागल्या. त्यावेळी सदर शेतकऱ्याने आरडाओरड केल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पाणी माती टाकत आग विझविली. मात्र या आगीत शेतकऱ्याचे १ लाख रुपये किमतीची ठिबक नळ्या जळून नुकसान झाले आहे. मारवड पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.




