अमळनेर:- येथील एआयएमआयएम च्या वतीने राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्य सैनानी हजरत टिपू सुलतान यांच्या बद्दल प्रजासत्ताक दिवसी अपशब्द वापरले म्हणून त्यांच्या निषेधार्थ अमळनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना लेखी निवेदन देण्यात आले.
एआयएमआयएमच्या मार्फत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई येथील एका मैदानाला प्रथम स्वातंत्र्य सैनानी हजरत टिपू सुलतान यांचे नाव देण्यास विरोध करीत हजरत टिपू सुलतान यांच्या विषयी अपशब्द वापरले ह्या मुळे सर्व मुस्लिम समाजाचे भावना दुखावल्या गेल्या आहेत. असे वक्तव्य करणाऱ्या राज्यातील विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्याचा जाहीर निषेध करीत आहे. ह्या निवेदनावर एआयएमआयएमचे तालुकाध्यक्ष अजहर शेख, शहराध्यक्ष हाजी सईद शेख, ता उपाध्यक्ष अँड अमजद खान, शहर उपाध्यक्ष कलीम शेख, अल्तमस शेख, करीम शेख, इकबाल शेख, नदीम शेख, आकिब शाह, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.