पातोंडा ता.अमळनेर:- येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत सर्वच उमेदवार आपापापला प्रचार करीत आहेत, परंतु विमुक्त भटक्या जाती जमाती मतदार संघामधून अपक्ष उमेदवार एकनाथ सुकलाल लोहार यांनी प्रचारात आघाडी घेतलेली दिसून येते आहे. त्यांची निशाणी ऊस धरलेला शेतकरी आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात सभासद मतदारांसह इतरांचा पाठिंबा मिळत आहे.
एकनाथ लोहार यांनी राखीव विमुक्त जाती-जमाती मतदार संघामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी ऊसधारी शेतकरी (गन्ना किसान) चिन्ह घेतले आहे. विशेष विकास सोसायटी ही शेतकऱ्यांची असल्याने उसधारी शेतकरी हे सभासदांचे पसंतीचे चिन्ह ठरले आहे. लोहार यांनी विकास सोसायटीत 30 वर्ष वरिष्ठ लिपिक या पदावर काम केले आहे. काही काळ त्यांनी प्रभारी सचिव पदाचा कार्यभार ही सांभाळला आहे. सेवेत कार्यरत असतांना त्यावेळी त्यांनी सभासदांशी वयक्तिक संबंध जोपासून, सोसायटी हितासह सभासदाच्या हाकेला नेहमीच साथ दिली आहे.तसेच त्यांनी एका फोन वर सभासदांचे काम केले. त्याच बरोबर अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करीत असत. त्यामुळे शेतकरी थकबाकीदार राहत नसत. या त्यांच्या कार्याची चौकाचौकात मतदार सभासदांन व ग्रामस्थान मध्ये दमदार चर्चा ऐकायला मिळत आहे. तसेच कर्ज माफी वेळी ही बहुसंख्य शेतकऱ्यांना योग्य सल्ला दिला आहे.त्यामुळे बहुसंख्य शेतकरी सभासदांचा फायदा झाला आहे. सेवेत असतांना शिक्षित अशिक्षित सर्व शेतकरी सभासद वर्गाला कायमस्वरूपी मदतीसाठी तत्पर असत, सभासदांना योग्य सल्ला देणे, आदी कारणामुळे वयक्तिक स्नेह संबध जोडले आहे. त्यांचा दांडगा जनसंपर्क व मनमिळावू स्वभाव आदी मुळे सुपरिचित आहेत. ते उच्च शिक्षित असून त्यांचे M.Com व L.D.C शिक्षण झाले आहे. त्यांना संस्थेच्या कारभाराचा दांडगा अनुभव असल्याने संस्थेला फायदाच होऊ शकतो. असे दापोरी, नांद्री, पातोंडा गावकऱ्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत आहे. त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे.