
पातोंडा ता.अमळनेर:- येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची सन 2021 ते 2026 या पंचवार्षिक निवडणूकीची प्रचाराची रणधुमाळी सुरू असून बहुजन व परिवर्तन पॅनल सह भटक्या विमुक्त जाती प्रवर्गात अपक्ष म्हणून उमेदवार असलेले एकनाथ लोहार यांचाही प्रचाराचा रंग चढला असून त्यांच्या “एक द्या अन बारा घ्या” ही प्रचार घोषणा ग्रामस्थांमध्ये व शेतकरी मतदारांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. स्वतः अपक्ष म्हणून असल्याने मला तुम्ही एक मत द्या आणि मी तुम्हांला बारा मते देतो असा सूचक सल्ला त्यांच्या घोषणे तून होत असताना दिसत आहे. लोहार हे सुशिक्षित असून ते विकासोचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत.सोसायटीचा कार्यभार, शेतकऱ्यांचे हिताबद्दल अनुभवी असल्याने त्यांनी मतदाराकडे आपल्या विजयासाठी साकडे घातले आहे.